नमस्कार,आज आपण स्तनपानबद्दल महत्वाच्या बाबी पाहणार आहोत. स्तनपान म्हणजेच Breastfeeding हा आई व बाळाचा सुंदर , भावनिक प्रवास आहे. तुम्हाला माहिती आहे का सध्या जागतिक स्तनपान आठवडा चालू आहे .( World breastfeeding week – 01 august to 07 August ). यासोबतच Advantages of Breastfeeding म्हणजेच स्तनपानाचे फायदे पाहूया.
स्तनपानाचे फायदे (advantages of breastfeeding)
आईचे दूध कितीही पातळ असो वा घट्ट ,पांढरे असो की पिवळे ते बाळासाठी संजीवनी असते. ते बाळाचे विशेष अन्न असते. म्हणुन बाळाच्या जन्मानंतर बाळाला पाणी पाजवु नये, मध वगैरे चाटवू नये. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या ४८ तासांमध्ये घट्ट पिवळसर स्त्राव स्तनांमधून यायला सुरुवात होते त्याला colostrum म्हणतात. ह्या colostrum मध्ये उपयुक्त प्रथिने असतात. colostrum मध्ये आईच्या नेहमीच्या दुधापेक्षाही जास्त प्रमाणात प्रथिने असतात. तसेच यामध्ये Antibody -IgG, IgM , IgA जे की बाळाची प्रतिकार शक्ती वाढवतात.
दुध पाजन्याची स्थिती (Position During Breastfeeding)
बाळाला आई कोणत्याही position मध्ये पाजवु शकते. स्तनपानासाठी स्तनावर बाळाची पकड योग्य असली पाहिजे व बाळ comfortable position मध्ये असले पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्तनाचा काळा भाग (areola ) पुर्णपणे बाळाच्या तोंडामध्ये असला पाहिजे.
आईचे दुध २ प्रकारचे असते. 1) FORMILK 2) HINDMILK
1) बाळ जेंव्हा प्यायला सुरुवात करते ते दूध थोडेसे पातळ असते, त्याला FORMILK म्हणतो. त्यात विविध प्रकारची उपयुक्त अशी PROTEINS, MINERALS, VITAMINS असतात पण पाण्याचे प्रमाण जास्त असते.
2) शेवटी जे दूध येते त्याला HINDMILK म्हणतात. हे दुध थोडे घट्ट असते व यामध्ये फॅट चे प्रमाण जास्त असते. हे HINDMILK पील्यानंतर बाळ संतुष्ट होते म्हणुनच बाळाला FORMILK व HINDMILK दोन्ही द्यावे.
जर बाळाचे पोट एका स्तनाच्या दुधानीच भरत असेल तर पुढच्या वेळेला स्तनपान करतेवेळी दुसऱ्या स्तनातून करावे. बाळाला पाजवून सुद्धा एखादे स्तन जड वाटत असेल,त्यामध्ये दुध आहे असे वाटत असेल तर दुध काढुन टाकावे.
स्तनपानाचे फायदे
(advantages of breastfeeding)
- सर्वात महत्वाचे- आई व बाळामध्ये emotional and psychological bond तयार होतो.
- बाळंतपणानंतर लगेचच स्तनपान केल्याने बाळंतपणानंतर होणारा रक्तस्त्राव कमी होहोण्यास मदत होते व वार (placenta ) लवकर सुटतो.
- नियमित स्तनपान केल्यामुळे मासिक पाळी ६-८ महिन्यांपर्यंत येत नाही त्यामुळे लवकर गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी होते.
- स्तनपामुळे स्तनांचा कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता ज्या आई स्तनपान करत नाहीत त्यांच्यापेक्षा खूप कमी होते.
- बाळंपणानंतर ज्या आई नियमित स्तनपान करतात तसेच संतुलित आहार व योग्य व्यायाम करतात त्यांचे वजन लवकरच maintain होते.
- बाळंतपणानंतर स्तन सैल होतात असे म्हणतात पण स्तनपान करणाऱ्या आईने जर स्तनपान काळात स्तनांना योग्य आधार दिला तर स्तन योग्य आकार मध्ये राहतात.
- आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला योग्य तापमानात दूध मिळते.
- वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांसाठी (PREMATURE BABIES ) आईचे दूध अमृत आहे. कारण त्यामुळे आवश्यक पोषकतत्वे व ANTIBODIES मिळतात.
स्तनपान काळात टाळायचे पदार्थ (Avoid during Breastfeeding)
- कॉफी – कॉफीमध्ये caffeine नावाचा घटक असतो. बाळ caffein व्यवस्थीत पचवु शकत नाही तसेच त्यामुळे बाळाची झोप कमी होते व बाळ चिडचिडे बनते. कॉफी पिल्यामुळे caffeine आईच्या दुधामध्ये उतरु शकतो.
- लोणचं व citrus fruits -citrus fruits म्हणजे संत्री, मोसंबीसारखी फळे. बाळाची अन्ननलिका परिपक्व झालेली नसते अश्या फळांमुळे व लोणच्यांमुळे पित्ताचे प्रमाण वाढते व बाळाला उलट्या व्हायला सुरवात होवु शकते.
- ब्रोकोली – ब्रोकोली पचायला जाड असते. आईने ब्रोकोली खाल्ल्यामुळे बाळाचे पोट बिघडू शकते व बाळाला gases होवु शकतात.
- शीतपेये अल्कोहोल -आईच्या दुधातून अल्कोहोल बाळाच्या पोटात जाऊ शकते. डिलिव्हरीनंतर कमीत कमी २ वर्षांपर्यंत अल्कोहोल व शीतपेये घेऊ नये.
- मसालायुक्त भाज्या – जास्त मसाल्याच्या भाज्य टाळाव्यात कारण बाळ ते पचवू शकत नाही त्यामुळे बाळाचे पॉट दुखू शकते.
- smoking – धूम्रपान करू नये. cigarette मध्ये nicotine असते. त्यामुळे बाळाच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.
Myth-
बाळ जन्मल्यानंतर बाळाला colostrum पाजवण्याआधीही मध चाटवावे.
Fact –
आईचे दूध हे बाळासाठी पहिले immunisation असते. बाळाला मध चाटवू नये.
Myth –
बाळाला आईच्या दुधासोबत पाणीही पाजवावे.
Fact –
बाळाला पहिले ६ महिने फक्त आणि फक्त आईचे दूध पाजवावे. आईच्या दुधामधून त्याची तहानही भागते. पहिले सहा महिने पाणी पाजवु नये.
Myth –
Formula milk आईच्या दुधाएवढेच पोषक असते.
Fact –
formula milk मध्ये आईच्या दुधाएवढेच पोषकतत्वे नसतात. आईला जर सर्दी खोकला झाला तर ज्या antibodies आईच्या शरीरात तयार होतात त्या बाळाला दुधातून मिळतात. त्या antibodies फॉर्मुला milk मधून मिळत नाहीत.
सारांश (Conclusion)
आईचे दूध हे बाळासाठी पोषणाचा संपूर्ण स्रोत आहे.
स्तनपान हा आई व बाळाचा सुंदर , भावनिक प्रवास आहे. स्तनपानामुळे बाळ व आईमध्ये भावनिक बंध तयार होतो व बाळाला आईजवळ विश्वास व सुरक्षीत वाटते. स्तनपान करणाऱ्या मातेने स्तनपान जातेवेळी शांत, समाधानी राहावे त्यामुळे दुध भरपूर येईल.
FAQ
1. स्तनपान कोणत्या वयोमर्यादेपार्यंत असावं पाहिजे?
A- स्तनपान बाळ जन्मल्यापासून कमीत कमी दीड ते दोन वर्षांपर्यंत करावे.
2. स्तनपान बाळाला कितीवेळा करणे आवश्यक आहे?
A- आपल्या बाळाला प्रत्येक दोन तासांत एकदा स्तनपान देणे आवश्यक आहे
3) प्रसूतीनंतर स्तनपान कधि चालु करावे?
A- प्रसूतिनंतर स्तनपान शक्य तितक्या लवकर किंवा एका तासाच्या आत चालु करावे.