नमस्कार मित्रानो Drsuleinfohub मध्ये आपले स्वागत आहे. आज आत्महत्या ही एक सामाजिक समस्या झालीय. आत्महत्या ही सामाजिक समस्या तर आहेच पण आत्महत्येवर मात (Winning over the Suicide) करणेसुद्धा हि एक समाजाची सामाजिक जबाबदारी आहे. या समाजाला झालंय काय? रोज आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. नुकतेच सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली, सुशांत सिंघ राजपूत ,डॉक्टर शीतल आमटेंनी तर depression (नैराश्य ) शी कसा लढा द्यावा त्याबद्दल सांगितले व स्वतःच आत्महत्या केली. याचे काय कारण असू शकेल? आपण त्यावर मात कशी करू शकतो ते पाहूया. तर मित्रानो आज आपण आत्महत्येची कारणे, परिणाम, व आत्महत्या थांबवण्याचे उपाय पाहुया. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट करुन त्या थांबवण्यासाठीचे उपाय पाहुया
आत्महत्या म्हणजे काय?
आत्महत्या म्हणजे स्वतःहून स्वतःचे जीवन संपवणे. काही लोक आपल्या संकटापासून, दुःखापासून मुक्त होण्यापासून हा मार्ग अवलंबतात.
आत्महत्येचे प्रकार- (Types of Sucide)
आत्महत्या ही एकसारखीच असते का? नाही आत्महत्येचे अनेक प्रकार असतात.
मित्रानो तुम्हाला Durkheim Social Theory of Suicide माहिती आहे का? ( What is Durkheim Social Theory of Suicide ?)
Durkheim ने आपल्या (suicide )पुस्तकामध्ये आत्महत्येचा सिद्धांत मांडला आहे. त्याचे खालील प्रकार सांगितले आहेत.
१) Egoistic Suicide-
काही लोकांना आपण एकटे पडल्याची भावना मनात घर करून राहते. आपण समाजापासून वेगळे आहोत असे वाटते. अशी व्यक्ती एकटी राहायला सुरुवात करते. तिला कुणीही समजून घेत नाही. अश्या व्यक्तीला आपले असे कुणीही वाटत नाही. अश्या व्यक्तीला एकटेपणापासून सुटका करण्यासाठी आत्महत्या हाच एकमेव मार्ग आहे असं वाटते, आणि अशातूनच हा व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो.
२)Altruistic Suicide –
काही लोकांना वाटते की आपल्या बलिदानाने किंवा मृत्यूने एखादा उद्देश्य सफल होणार आहे तेव्हा अशी लोक आत्मघात करतात.
ह्या प्रकारात व्यक्ती सामूहिक अस्तित्वावर आलेल्या संकटाला व्यक्तिगत स्वरूपात घेतो. उदा. जिहादी ,suicide bomber.
दुसऱ्या जागतिक युद्धावेळी जपानी सैनिकांना माहित होते की ते हरणार आहेत तरीही त्यांनी आपले बलिदान दिले कारण त्यांना माहित होते कि ते देशासाठी लढत आहेत.
अमेरिकेत Twin tower वर झालेला हल्ला आठवतो का तुम्हाला तो सुद्धा एक suicide bomber होता.
३) Anomic Suicide –
ह्या मध्ये अचानक एखादे संकट येते. उदा. अचानक आर्थिक संकट येणे, परीक्षेमध्ये अपेक्षित गुण न मिळणे, प्रेमभंग होणे, दुष्काळ.
अश्यावेळी व्यक्तीला वाटते की ह्या संकटापुढे माझे जीवन शुन्य आहे. आता जगण्याला काहीच अर्थ नाही.
त्यांच्या आयुष्यात पुढे त्यांना फक्त अंधकार दिसतो आणि दुर्दैवाने ते आत्मघाताचे पाऊल उचलतात. उदा. आत्ताच नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली.
तसेच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा एक ज्वलंत मुद्दा आहे. शेतकरी आत्महत्या हे सुद्धा Anomic Suicide चेच उदाहरण आहे.
४) Fatalistic Suicide –
या प्रकारात व्यक्ती दबावाखाली असते. तिच्यावर खूप नियम,शिस्त लादलेली असते. उदा एखादा नौकर आत्महत्या करतो किंवा एखादी वांझ स्त्री आत्महत्या करते. यामध्ये व्यक्तीला आत्महत्या हा एकाच पर्याय दिसतो.
याशिवाय अजूनही काही प्रकार आहेत जसे की –
५)copycat suicide –
एखादा आदर्श व्यक्ती आत्महत्या करत असेल तर त्याला अनुसरण करणाऱ्याला वाटते कि माझेही वय त्याच्याएवढेच आहे व मलाही त्याचे अनुसरण करायला हवे. हा प्रकार तरुणांमध्ये जास्त पाहायला मिळतो.
६)Impulsive suicide –
या मध्ये समोर आलेल्या परिस्थितीला पटकन प्रतिक्रिया दिली जाते.
कसलाही विचार न करता कृती होते. उदा परीक्षेचा निकाल कळल्याबरोबर मागचा पुढचा विचार न करता आत्महत्या करणे किंवा एखादा game खेळत त्या परिस्थितीला प्रतिक्रिया म्हणून आत्महत्या करणे. उदा काही दिवसापूर्वी Blue Whale game मुळे बऱ्याच तरुण मुलांनी स्वतःचे जीवन संपवल्याचे ऐकलंच असाल.
आत्महत्येचे प्रमाण –
विकिपीडिया नुसार जगात दरवर्षी ८००,००० लोक आत्महत्या करतात तर भारतात २०२१ मध्ये १,६४,०३३ लोकांनी आत्महत्या केल्याची शासनाकडे नोंद आहे .
भारतामध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात आहे त्याखालोखाल तामिळनाडू व मध्यप्रदेश हे राज्य येतात.
आत्महत्येचा प्रयत्न स्त्रिया जास्त प्रमाणात करतात पण वास्तविक पाहता आत्महत्या करण्याचे प्रमाण हे पुरुषामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. कारण पुरुष आत्महत्येसाठी आक्रमक पद्धत अवलंबतात.
४५-५० वर्ष वयोगटांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषामध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.
किशोरवयीन मुलांमध्ये Accident व खुनानंतर मृत्यूचे तिसरे कारण आत्महत्या हे आहे.
१९-२५ वर्ष वयामध्ये मृत्यूचे अपघातानंतर दुसरे कारण आत्महत्या हे आहे.
विवाहित व्यक्तींपेक्षा अविवाहितांमध्ये Suicide attempt चे प्रमाण जास्त आहे. तसेच बेरोजगार तरुणांमध्येही आत्महत्येचे प्रमाण जास्त दिसून येते.
आत्महत्येची कारणे – (Causes of Sucide)
- आत्महत्येचे पहिले कारण अति जास्त विचार करणे आहे.
- कौटुंबिक कलह – हे सुद्धा आत्महत्येचे एक महत्वाचे कारण आहे.
- बेरोजगारी – एखाद्या व्यक्तीची नौकरी गेलेली असेल, धंद्यामध्ये तोटा झाला तर आत्महत्येचा धोका ३% नि वाढतो. उदा. कोरोनामुळे अनेक जणांच्या नौकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले.
- मंदी -आर्थिक मंदी असेल, पिकाला चांगला भाव नसेल किंवा खूप कष्ट करूनही पीक चांगले न आल्यामुळे आर्थिक तोटा झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतात. हि चिंताजनक बाब आहे.
- मानसिक व्याधी – आत्महत्येच्या प्रवृत्तींमध्ये मानसिक आरोग्याचा मोठा सहभाग आहे. व्यक्ती सतत तणावाखाली असेल तर आत्महत्येचा प्रयत्न करू शकते.
- शारीरिक व्याधी – उदा कॅन्सर सारख्या आजारात रुग्ण वेदना सहन करू शकत नाही व तो स्वतःला संपवतो.
- प्रेमभंग
शेतकरी आत्महत्येची कारणे –
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण आर्थिक विवंचना हे आहे. शेती करण्यासाठी,बी-बियाणे विकत घेण्यासाठी कर्ज काढले जाते.
पण पिके चांगली न आल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाही व कर्जाच्या विळख्यात अडकत जातो.
कर्ज परतफेड न केल्यामुळे नाराश्येपोटी शेतकरी आत्महत्या करतो.
चेतावणी चिन्हे /Warning Signs of Suicide/ 12 popular Warning signs of Suicide –
- आत्महत्येचे विचार मनात सतत घोळत असणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावात अचानक बदल होतो.
- ती व्यक्ती एकटे राहायला सुरवात करते.
- विद्यार्थी असेल तर त्याचे अभ्यासात लक्ष नसते. समोर पुस्तक असले तरी तो शुन्यात पाहत असेल. मित्रांमध्ये मिसळत नसेल.
- ती व्यक्ती सतत उदास राहते.
- मनांतल्या मनात तीव्र वेदना होणे.
- प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करणे.
- छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणे.
- झोप खूप येते किंवा झोपच लागत नाही.
- सतत मरण्याच्या गोष्टी करणे.
- सतत धोकादायक कामे करणे. उदा गाडी खूप वेगात चालवणे.
- चुकीच्या सवयींचे किंवा व्यसनाचे प्रमाण वाढणे. उदा alcohol, तम्बाखूचे सेवन वाढणे.
आत्महत्येचे परिणाम –
आत्महत्या केल्यामुळे ते करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य तर संपलेच पण त्याच्या कुटुंबावर याचे दूरगामी परिणाम होतात जसे
- आत्महत्येमुळे व्यक्तीच्या जवळच्या लोकांवर भावनिक आघात होतो.
- कुटुंबातील जवळची व्यक्ती गमावल्यामुळे इतर सदस्य नैराश्य, चिंता यांनी प्रभावित होऊ शकतात.
- त्यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) (POST TRAUMATIC STRESS DISORDER) सारख्या मानसिक समस्या समस्या उदभवु शकते.
- अकाली आत्महत्या केली असेल तर कुटुंबाचे उत्पन्न कमी होऊन आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते.
- वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे समाजावर दीर्घकालीन परिणाम होत आहे. समाजाने आत्महत्येकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहायला हवे.
तर मित्रानो यातील सगळी लक्षणे किंवा काही लक्षणे आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये दिसून आली तर तिला वेळीच मदत करा. तिला समजून घ्या.
तिच्याशी आपुलकीने, प्रेमाने संवाद साधुन या परिस्थितीतुन बाहेर काढायचा प्रयत्न करा. तिला धीर द्या.
गरज असेल तर वेळीच मानसोपचारतज्ञाकडे न्या व उपचार चालू करा.
शेतकरी आत्महत्या रोखण्याचे उपाय –
सरकार शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. सबसिडी देऊ शकते.
पीक विमा दिल्यामुळे पिके नाही पिकली तरी शेतकरी निराश होणार नाही. यासाठी विविध सरकारी धोरणांची माहिती द्यावी.
स्वयंसेवी संस्थांनी शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र चालू करावे तसेच आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग दाखवावेत.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन कसे वाढेल याच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत.
FAQ’S
Q. आत्महत्या रोखणे शक्य आहे का?
A. हो नक्कीच! वेळेवर भावनिक आधार दिला, धीर दिला तर तसेच गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेतल्यानंतर आत्महत्या रोखणे शक्य आहे.
Q.आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीची सामान्य चेतावणी चिन्हे / Warning Signs कोणती आहेत?
A. अचानक स्वभावात बदल होणे.( Behaviour change) उदा. चिडचिडेपणा वाढणे, एकलकोंडा होणे, आप्तस्वकीयांपासून दूर राहणे.
Q. जो आत्महत्येचा विचार करत असेल त्याला मी मदत करू शकतो का ?
A. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्या.
त्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, तिला धीर द्या ,तिला शक्य होईल त्या प्रमाणे मानसिक, आर्थिक मदत करा. आपुलकीने समजावून सांगा. तिला नैराश्यातून बाहेर कसे काढता येईल त्यासाठी सर्व प्रकारे मदत करा.
Q. आत्महत्या रोखण्यासाठी काही हेल्पलाइन उपलब्ध आहेत का?
Helpline no for Prevention of Suicide-
A. 9152987821 हा हेल्पलाईन क्रमांक आहे.
अजून काही मदतीचे क्रमांक –
1. Jeevan Aastha Helpline :
Toll-Free: 1800 233 3330 ( Verified )
( 24x 7 available, operated by Gandhi Nagar Gujrat Police in association with a psychologist: VERIFIED: SUICIDE, DEPRESSION, CAREER COUNSELLING, ADDITION )
2. AASRA : 09820466726
( Language: Hindi and English )
३. KIRAN HELPLINE 1800-599-0019
ही भारत सरकारने चालू केलेले मदत केंद्र आहे, हे मदत केंद्र एकूण १३ भाषामध्ये काम करते.